Gulabi thandi marathi kavita

Gulabi thandi marathi kavita

winter has started so enjoy winter season,  below gulabi thandi marathi kavita is for you.

गुलाबी थंडी 

थंडीमुळे आज चाफा ही
गारठला होता.......
सुगंध पसरायला त्यालाही 
आज जरा वेळच झाला होता....

काटे असुनही गुलाब थंडीतही सुंदर दिसत होता....
देवाच्या चरणी जाईन की  केसात माळला जाईन . . . ? याचाच विचार करत होता....

सदाफुलीचंही अगदी 
सेम  तसंच होतं
 गुलाबी थंडीतही चेह-यावर एक प्रसन्न हास्य होतं.....

अबोली मात्र नेहमीप्रमाणे
शांत बसली होती...
अगांवर मात्र तिने थंडीची
मखमली चादर लपेटली होती....

मोग-यालाही ऊठण्यास
आज उशीरच झाला होता 
सुवास मात्र त्याने चहुकडे 
मध्यरात्रीच दरवळला होता 

जाई आणि जुई जास्तच
शुभ्र दिसत होत्या 
थंडीच्या धुक्यात त्या बिचा-या
 केव्हाच हरवल्या होत्या 

रात्रभर जागरण करुन 
रातराणी नुकतीच ऊठली होती 
पानांवरच्या दवबिंदूंशी ती
काहीतरी गुजगोष्टी करत होती 

पारिजातकानेही फुलांचं
अंथरुण तयार केलं
थंडीमध्ये गारठलेल्याला
वासाने आपलंस केलं

गंधाळलेल्या नजरेनी
निशीगंध सारे पाहत होता
थंडीतल्या कोवळ्या किरणांना
तो हसत अंगावर घेत होता 

गुलाबी थंडीत फुलांची अशी
मजा चालली होती.. संकटातही
प्रसन्न रहा असे प्रत्येक पाकळी
हसुन सांगत होती...☃💖💖🌷🌹🥀🌻🌼🌸🌺💖💖☃


Previous Post
Next Post

post written by:

Hi friends, welcome to the Apalimarathistatus.in , We started Apalimarathistatus.in as a passion, and now it’s empowering more than 900K+ readers globally.

0 comments: