Marathi jokes

marathi chavat jokes is the popular type of marathi jokes

1) पप्पू आणि पप्पा :

पप्पू: पप्पा तुम्ही भूतांमध्ये विश्वास ठेवता काय हो ..??
पप्पा : नाही रे वेड्या .. भूत बित तसलं काय नसत या जगात …
पप्पू: मग आपली कामवाली म्हणत होती आपल्या घरात भूत आहे म्हणून
पप्पा : चल सुटकेस मध्ये आपले कपडे भर …
पप्पू: प . पण का पप्पा ….???
पप्पा : आपल्याकडे कोणतीच कामवाली नाहीये.

2) अनुपने भंगार मध्ये पडलेली बाबा आदमची सायकल बाहेर काढली.
ती दुरूस्तीसाठी सायकल रिपारिंगवाल्याकडे नेली. तेव्हा त्यांच्या सायकलची अवस्था पाहून
तो ‘साहेब, या सायकलची दुरूस्ती करणे अशक्य आहे’
अनुप: ‘पण नेपोलियन बोनापार्ट तर म्हणत होता. जगात काहीही अशक्य नाही’
तो: ‘मग त्याच्याकडेच घेऊन जा.’

3) असा कोणता गामा(पहेलवान) आहे, ज्याने आयुष्यांत कधी कुस्ती खेळली नाही?
वास्को -द- गामा!

4) नोकर- ‘साहेब मला केराच्या टोपलीत शंभराच्या पाच नोटा सापडल्या, हे घ्या.’
मालक- ‘मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोटा आहेत त्या’
नोकर – ‘म्हणूनच परत करीत आहे.’

5) शिक्षिका- मुलांनो! आपण नेहमी वडिलांच्या नावामागे श्री लावत जावे.
रोहन; तुझ्या वडीलांचे नाव काय आहे?
रोहन- श्रीमतीराम!
शिक्षिका- गाढवा, वडिलांच्य नावामागे श्री. लावावे व आईच्या नावामागे श्रीमती. समजलं?
रोहन- पण बाई, माझ्या वडिलांचे नाव मतीराम आहे!

6) एक दारूडा रस्त्यावरून जात असताना तिकडून एक व्यक्ती येत असते. तेव्हा तो
दारूडा – अरे, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये?
ती व्यक्ती- मी काही तुझा नोकर नाही.
दारूडा- मग कोण आहेस?
ती व्यक्ती- एअर कमांडर!
दारूडा- मग विमान घेऊन ये!



7) मराठीच्या शिक्षकांनी दादूला प्रश्न केला, “कवी यशंवताच्या जन्म-मृत्यूचे इसवी सन सांग.”
“माहीत नाहीत सर.”
दादू म्हणाला. “माहीत नाही? पुस्तक काढून यशवंताची कविता पाहा.
परिचयात त्यांच्या नावापुढे कंसात काय लिहिलय ते वाच!” शिक्षकांनी आज्ञा दिली.
दादूनं पुस्तक काढून वाचल, “यापूर्वी कधी वाचलं नव्हतं का हे?”
शिक्षकांनी विचारलं. “हे तर माहीत होतं मला,” “मग माहीत नाही असं का म्हणालास?”
शिक्षक रागावले. “मला वाटलं हे त्यांचे दूरध्वनी क्रमांक असावेत, दादू म्हणाला!!

marathi jokes
8) राजू आपल्य वडिलांना म्हणत होता,
“पप्पा, केशवसुत कोण होते हे?”
“केशवसुत? एवढंही ठाऊक नाही तुला?
इतिहासाच पुस्तक आण तुझं,
आता सांगतो” वडील म्हणाले.

9) एका मराठी लेखकाच्या आत्मचरित्रांच प्रकाशन झाल्यावर आठच दिवसांनी त्यांची मुलाखत घेणाऱ्या एका पत्रकाराने त्यांना प्रश्न केला,
“आत्त्मचरित्र लिहून तुम्हाला काय मिळालं?”
“दोन हजार शत्रू,” लेखक महोदय म्हणाले!

1.

झंप्या : ए पंप्या, एवढा घाबराघुबरा का झालायस बुवा तू?

पंप्या : अरे, थोडं कन्फ्युजन झालं यार.

झंप्या : म्हणजे?

पंप्या : अरे मी रस्त्यावरून चाललो असताना मला समोर काहीतरी दिसलं. मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.

झंप्या : हात्तिच्या…एवढंच ना.

पंप्या : हो रे…पण मग त्या सापाला मारण्यासाठी म्हणून मी जी काठी उचलली ना, तो खरा साप निघाला.

2.

कावळा : चिऊताई, चिऊताई, दार उघड!

चिमणी : थांब माझ्या बाळाला पावडर लावते…

कावळा : माझ्या सोबत माझी मुलगी पण आहे..

बाळ : आई, पावडर मी लावतो, तू पहिले दार उघड!!!


jokes in marathi language
3.

कांदयाने कोबीशी प्रेम विवाह केला.

दुसरया दिवशी कांदयाला मित्र विचारायला लागले,

…काय मित्रा, लग्नाची पहिली रात्र कशी होती?

कांदा : अरे कसली डोंबल्याची रात्र, एकमेकांचे कपडे उतरवेपर्यंत सकाळ झाली.

4.

प्रियकर – प्रिये, सांग ना मी तुझ्यासाठी काय करू?
प्रेयसी – काय करशील?
प्रियकर – तू सांगशील ते करीन!
प्रेयसी – मग आधी नोकरी कर.
प्रियकर – का?
प्रेयसी – म्हणजे एकदाचं लग्न तरी करता येईल!

5.

एकदा संता बंताला स्वत:च्या घरी बोलावतो,
जेव्हा संता बंताच्या घरी जातो तेव्हा , बंताच्या घराला टाळे लावलेले असते आणि
तिथे लिहुन ठेवलेले असते ” तुझा पोपट झालाय , चल फूट इथून ”
संता खाली पड्लेला खडु उचलतो आणि लिहितो
“मी आलोच नव्हतो ”

1.
रामू – ए राजू, तुला मी एका सेकंदात अख्खे गाणे म्हणून दाखवू?

राजू – शक्यच नाही, चल म्हणून दाखव पाहू.

रामू – गा S S णे!

राजू – अरे वा! चल, मीसुद्धा तुला फटाका न फोडता अगदी तुझ्या दोन्ही कानांजवळ फटाक्याचा मोठा आवाज काढून दाखवतो.

रामू – दाखव की…त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच राजू त्याच्या कानांखाली पेटवतो

फाट…. फाट…



2.

पुण्यातल्या पोरीला बर्थ डे गिफ्ट काय द्याल ????.


१ डझन स्कार्फ 🙂 🙂



3.

मंग्या : मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केले, तुला कधी स्पर्श देखील नाही केला

तरीही जर तू दुस-या मुलाशी लग्न केले तर मी काय समजायचे ?.

.

.

.

चिंगी : दैवाने दिले आणि कर्माने नेले..

hasyagappa in marathi

4.

‘मित्राकडे गेलो होतो गं!’ उशीरा घरी आलेला गंपू बायकोला कारण सांगतो.

खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या १० मित्रांना फोन करते.

पाच जण सांगतात, ‘हो, आलेला ना इथे!’

तिघे सांगतात, ‘हा काय, आत्ताच गेला..’

उरलेले दोघे म्हणतात, ‘अहो वहिनी, हा काय इथेच आहे! देऊ का त्याच्याकडे फोन?

5.

कामवाली गंगू रागारागात मालकिणीला म्हणाली,



मॅडम तुमची हि साडी परत ह्या,



मॅडम : अरे पण का?



गंगू : मग काय, हि साडी नेसली कि साहेबाना वाटत तुम्हीच आहात, ते लक्ष पण

देत नाहीत आणि माळ्याला पण वाटत तुम्हीच आहात, तर तो येता जाता चावटपणा

करतो…

1.

दादा कोंडकेंनी आपल्या पणजीच्या स्मरणार्थ बैंक सुरु केली तीचे नाव ठेवले:

:

:

:

:

:

“आयच्या आयची आय ब्यांक ”

2.

संता मित्राच्या पार्टी मध्ये ड्रिंक घेत उभा होता, एवढ्यात त्याच लक्ष एका सुंदर मुलीकडे गेल,

संता : तू माझ्या बरोबर डान्स करशील का?

मुलगी (तुच्छतेने) : मै बच्चे के साथ डान्स नही करती….

संता : ओह्ह… माफ कर हा, मला माहित नव्हतं तू प्रेग्नन्ट आहेस.

3.

पक्या : डार्लिंग, तुझ्या आयुष्यात मी पहिलाच आहे ना, ज्याने तुझं चुंबन घेतलं?

चिंगी : अर्थातच सोन्या, पण मला हे कळत नाही कि सगळे जण हाच प्रश्न का विचारतात.



marathi chavat jokes
4.

मराठी भाषा…!!

मराठी भाषा फारच अजब आहे ना…??

….गाडी ‘बिघडली’ असेल तर म्हणतात ‘बंद’ आहे.

आणि पोरगी बिघडली असेल तर म्हणतात ‘चालू’ आहे…….

5.

एकदा एका कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली.

संता (चिडून ओरडतो) : तू चड्डी नाही घालत का रे ?

कावळा : तू चड्डीतच करतो का रे ??

बायकॊला “बडबड बंद कर” असं कधीच न सांगता

“ऒठ मिटल्यावर तू फार सुंदर दिसतेस” म्हणा.



6.


सफरचंद गोड असायला पाहिजे ,‘लाल’ तर 'आडवाणी' पण आहेत।😜😜.






मुलगा हँडसम दिसायला पाहिजे,‘स्मार्ट’ तर 'फोन' पण आहेत।😜😜..



माणसाच मन मोठ असायला पाहिजे,‘छोटा’ तर 'भीम' पण आहे।😜😜..



मुलीला अक्कल असली पाहिजे,‘सूरत’ तर 'गुजरात' मधे पण आहे।😜😜..



रिप्लाय हा मस्त करता आला पाहिजे,‘Hmmm’ तर 'म्हैस' पण करते!😜😜..



माणसाला समजूतदार असायला पाहिजे,‘सेंसेटिव’ तर 'टूथपेस्ट' पण आहे।😜😜..



फिरायला तर हिल स्टेशन वर गेले पाहिजे ,‘गोवा’ तर 'पान मसाला' पण आहे।😜😜..



औषध आजार ठीक करणारे असायला पाहिजे,‘टँबलेट’ तर 'सैमसंग' चा पण आहे।😜😜..



मोबाइल जनरल मोडवर असायला पाहिजे ,‘साइलेंट’ तर 'मनमोहन' पण आहे।😜😜..






याला म्हणतात न्यू मेसेज..नाहीतर न्यू तर दिल्ली पण आहे।😁😁😜😜😜😜😂😂😂
Previous Post
Next Post

post written by:

Hi friends, welcome to the Apalimarathistatus.in , We started Apalimarathistatus.in as a passion, and now it’s empowering more than 900K+ readers globally.