Poem on mother in marathi
Marathi poems are very famous on aai (Mother)   Miss u आई
Poems on aai in marathi

वाचता नाही अंगावर काटा उभा रहावा अशी ही कविता...  खुप खुप छान लिहिलीय...
.
.
 शप्पत नक्की वाचा.
.
.

"साद आईची"
.
.

महिनेमागून महिने,
शेवटी वर्ष सरुन जाते
वृध्दाश्रमाच्या पायरीवर ,
वाट तुझी पाहाते
.
.

भिजून जातो पदर ,
अन मन रिते राहाते
कधी मधी मात्र ,
तुझी मनीऑर्डर येते
.
.

पैसे नकोत यावेळी ,
तूच येऊन जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा
.
.

तुझा बा होता तोवर ,
काळ बरा गेला
तुझी आठवण काढत ,
उघड्या डोळ्यांनी गेला
.
.
शेवटपर्यंत सांगत होता,
 लेक माझा भला
तू मोठा साहेब,
त्याचं मोठं कौतुक त्याला
.
.
माझ्याही ह्रदयात फोटो,
 तुझा तू पाहून जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा.
.
.
दुष्काळाच्या साली ,
जन्म तुझा झाला
तुझ्या दुधासाठी ,
आम्ही चहा सोडून दिला
.
.
वर्षाकाठी एक कपडा,
 पुरवून-पुरवून घातला
सालं घातली बापाने,
पण तुला शाळेमधी घातला..
.
.

हवं तर तू हे ,
सगळं विसरुन जा
पण बाळा मला ,
तुझ्या घरी घेऊन जा.
.
.
धुणी-भांडी करीन मी,
केरकचरा भरीन मी
पुरणपोळ्या, अळुवड्या ,
तुझ्यासाठी रांधीन मी
.
.

नातवंडांचं दुखलं-खुपलं ,
सगळं बघेन मी
घाबरु नकोस, त्याची आजी ,
असं नाही सांगणार नाही मी
.
.
तुझ्या घरची कामवाली ,
म्हणून घेऊन जा
पण बाळा मला
तुझ्या घरी घेऊन जा.
.
.
थकले रे डोळे बाळा,
प्राण कंठी आले
तुझ्याविना जगणे
आता मुश्किल झाले
.
.

विसरु कशी तुला मी,
तुझ्यामुुळे आई झाले
बाळ माझं 'कुलभूषण'
पोरकी मी का झाले?
.
.

आता माझ्या थडग्यापाशी
'आई' म्हणून जा
जमलंच तुला तर
हा वृध्दाश्रम पाडून जा.
.
.
...
.

.
आईवर प्रेम करत असाल तर नक्की शेअर करा...
😘❤

marathi poem on aai 
This is best story on mother in marathi, Please share if you like.

poem on mother in marathi language 
मराठी कविता 
short poems on mother in marathi 
marathi kavita on father and daughter 
marathi poem on mother and father 
poem on father in marathi 


मुलाच्या वाढदिवशी रात्री दीड वाजता आईने फोन केला.
.
म्हणाली, बाळा, वाढदिवसाच्या शुभेच्छा....
.
 मुलगा वैतागला. चिडूनच म्हणाला,
.
"अगं, ही काय वेळ आहे फोन करायची ?
.
सकाळी फोन करता आला नसता का ?"
.
शुभेच्छांचा स्वीकार न करता मुलाने फोन ठेऊन कट केला.
.
 काही वेळाने त्याच्या खास मैत्रिणीचा फोन आला,
.
तब्बल दोन तास बोलला.
.
 नंतर मैत्रिण फोन ठेवते बोलली, सकाळी बोलु बोलली
.
 तरी तिची ईच्छा नसतानाही अजुन जबरदस्तीनं दहा मिनिटं जास्तच बोलला,
.
 शेवटी तिनंच फोन कट केला..
.
 नंतर एवढा वेळ फोन व्यस्त लागुनही वडिलांनी फोन केला.
.
आता तो मुलगा रागवत नाही, पण शांतपणाने म्हणतो, "बाबा, सकाळी करायचा ना फोन ...
.
आताच आईचा फोन येऊन गेला. तिने ..."
.         
 वडील म्हणाले, "मी तुला हेच सांगायला फोन केलाय, की
.
 तुझी आई खरंच वेडी आहे,
.
 मूर्ख आहे जिनं तुला तुझा वाढदिवस म्हणून फोन करून तुझी झोपमोड केली.
.
 खरं तरं ती पंचवीस वर्षांपूर्वीपासूनच अशी वेडी, मूर्ख झालेली आहे.
.
पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा डॉक्टरानी तिला सांगितले होते,
.
की तातडीनं ऑपरेशन करून मूल अॅबाॅर्ट करावं लागेल तेव्हा आई जगू शकेल.
.
पण तेव्हा ती मरायलासुद्धा तैयार झाली होती.
.
तुला जन्म द्यायचाच ही भावना होती तिची.
.
रात्री दीड वाजता तुझा जन्म झाला बाळा.
.
संध्याकाळी सहा वाजल्यापासून तिला प्रसववेदनांनी त्रास होत होता.
.
त्यावेळी खरंच ती जीवन मृत्यूच्या उंबरठ्यावर होती असह्य वेदना सहन करत !
.
 पण तुझा जन्म झाला आणि ती सगळ्या वेदनाच विसरून गेली.
.
 डॉक्टरांनी तर आधीच आमच्याकडून लिहून घेतले होते की
.
तिच्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर डाॅक्टर जबाबदार नाहीत म्हणून ...
.
तुझा जन्म सुखरूप झाला आणि तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
.
आज तुला रात्री दीड वाजता फोन करून तुझी झोपमोड केली
.
त्याबद्दल तिला माफ कर.
.
 एक सांगायचंय, तुझी आई पंचवीस वर्षांपासून मला रोज रात्री दीड वाजता उठवते
.
 आणि अभिमानाने सांगते, आपल्या बाळाचा जन्म याचवेळी झाला होता बरं का
.
 .... फक्त हेच सांगण्यासाठी तुला फोन केला होता.
.
असं सांगून वडिलांनी फोन ठेऊन दिला.
.
 मुलगा हे सगळे ऐकून सुन्न झाला होता.
.
सकाळीच तो वडिलांच्या घरी पोहोचला.
.
आईचे पाय धरून त्यांची त्याने माफीही मागितली.
.
 वडील म्हणाले , "ती नेहमी म्हणायची,
.
आपला मुलगा आहे, त्यामुळे आपल्याला कसलीही चिंता नाही.
.
आता मी तिला सांगेन जशी आधीपण काळजी घेतली, तशीच तुझी काळजी मी यापुढे घेईन.
.
" आई म्हणाली, "असू द्या हो  माफ करा त्याला ...."
.
आई वडिलांना आपली धन दौलत, सम्पत्ती नव्हे तर आपले प्रेम हवं असतं.
.
तुम्ही त्यांची काळजीही करावी अशी त्यांची अपेक्षा नसते पण तुमच्यामध्ये त्यांच्याप्रति जाणीव जरी दिसली तरी त्यांना धन्य वाटते
.
तुम्ही आई-वडिलांना वेळ द्यावा अशीही त्यांची इच्छा नसते
.
पण त्यांना वेळ दिलात तर त्यांना समाधान वाटते कारण त्या दोघांचं प्रेम जगात अनमोल आहे.
 
🍥☝एकदा फुललेले फुलं पुन्हा फुलत नाही...

एकदा मिळालेला जन्मं पुन्हा मिळत नाही...

हजारो माणसे मिळतील आयुष्यात पणं...

आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडिल पुन्हा मिळणार नाही...🍥☝

या दुनियेत तुंम्हाला सगळं सगळं मिळेल पण पण .......................................................
Love you
👏आई & बाबा👏


poem on mother in marathi 
aai var marathi kavita 
aai poem in marathi language



मुलगा--
बाबा चलाना आपन आत्याच्या लग्नात जाऊ

बाबा--
आई सोबत जा मला शेती साठी ख़त आणायची आहे !

मुलगा--

बाबा बाबा चलाना आज आपन सिनेमा पाहायला जाऊ

बाबा---

दादा सोबत जा मला पेरणी कारायची आहे !

मुलगा--
बाबा चला घरी रात्र झाली

बाबा--
तू जा झोप मला पानी दयाच् आहे सकाळी लाइट जाईल !

मुलाला समजल की बाबा शेतीसाठी सम्पूर्ण जीव लावतात रात्र बे रात्र जागी राहतात
आता बाबानी घेतलेले कष्ट
मेहनत ला रंग पिक आल्या नंतरच येईल हे

बाबा त्यावर म्हणाले
नाही पिक आल्यानंतर तुझ्या बहिनीच लग्न कारायच !

आई साठी लुगड़ घेयाच् !

 तुला शाळेत धाडायच !

दादाला नोकरीला लावायच !

तेव्हाच माझा कष्टाला यश येईल !

मुलगा हसत हसत बाहर येतो
 येऊन आभाळाला पाहतो

आणी

त्याला धक्काच बसतो !

त्याला खात्री होते अवकाळी पाऊस येणार
 पीके उद्गस्त होणार

 पीके उध्वस्त झाली तर
आईला लुगड़ नाही
ताईच लग्न नाही
 दादाला नोकरी नाहीं
मला शाळा नाही
याहूंन सर्वात मोठ म्हणजे
माझा वडिलांनी केले काबाड़ कष्ट वाया जाईल !

तो घरात पळत आला आणी बाबाचा चेहरयावर समाधान पाहून

 पुन्हा बाहेर येऊन पाऊसाला म्हणाला ,

नको रे बरसू

आत्ता तोंडाजवळ चा घास
भिजला !

हा घास पिकवायला माझा बाप रात दिन
झिजला !

😭😞😔😥
या post  ला माझ्या कडून 🙏
वाचणारा रडलाच पाहिजे



Above post is dedicated to all parents , my dear friends please share this marathi kavita on mother,  aai var kavita in marathi 
marathi quotes on life 




पहिला शब्द जो मी उच्चारला,
पहिला घास जीने मला भरवला,
हाताचे बोट पकडून जीने मला चालवले,
आजारी असताना जीने रात्रंदिवस काढले.
आठवतय मला, चूकल्यावर धपाटा घातलेला,
भूक लागली आहे सांगताच खाऊचा डब्बा पुढे केलेला.
अनेकदा तिने जेवणासाठी थांबायचे,
आणि मी मात्र न सांगताच बाहेरून खाऊन यायचे…
कधी कधी रागाच्या भरात उलट ही बोललोय,
आणि मग चूक समजल्यावर ढसा ढसा रडलोय,
तिने सुद्धा माझे बोलणे कधीच मनावर नाही घेतले,
मागाहून घालवलेले माझे अश्रू पदराने पुसून टाकले.
माझी स्तुती करताना ती कधीच थांबत नाही…
अन माझा मोठेपणा सांगतान तिच्या आनंदाला पारावर ऊरत नाही…
माझा विचार करणे तिने कधीच सोडले नाही..
माझ्यावर प्रेम करण्याला कधीच अंत नाही…
मी सुद्धा ठरवले आहे तिला नेहमी खुश ठेवायचे,
किती ही काही झाले तरी तिला नाही दुखवायचे,
आईची महानता सांगायला शब्द कधीच पूरणार नाही,
तिचे उपकार फ़ेडायला सात जन्म सुद्धा शक्य नाही…
देवाकडे एकच मागणे भरपूर आयुष्य लाभो तिला,
माझ्या प्रत्येक जन्मी तिचाच गर्भ दे मजला…



marathi poem on mother for children 
mother's day poem in marathi 


आई तुझ्या संस्कारातुन,
कोवळ्या रोपाचे तरु झालो,
मी कसा गं विसरेन तुला,
तुझ्यामुळेच मी महान झालो…
तुझा तो मायेचा पदर,
लपवित होता सारे प्रमाद,
तुझ्याविना माझा क्षण,
नव्हता गं जात…
कधी तु मारलेस मला,
तुझा प्रेमळ करांनी,
पण दोष देशी स्वःताला काही क्षणांनी…
दुर जाता तुझ्यापासुन,
चिंता लागे तुझ्या जिवा,
जरी मी मोठा झालो,
तरी तुझा मायेचा पदर हवा…



 😊 निवांत वाचा. खरोखर छान वाटेल...😊

*"कौतुक हे स्मशानातच होतं".....!!!

🔴 कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा, आपण स्वतः चार पावले चालुन समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन मगच खात्री करा.
🔴 नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे ...बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही.
कारण..पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते,विजांच्या कडकडाटामुळे नाही..                                       
🔴आणि वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं..डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!! निवड आपली आहे.."                                 
🔴कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.
🔴डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,अन्...भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
🔴जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणुन..!
🔴मोर नाचताना सुद्धा रडतो...आणि...राजहंस मरताना सुद्धा गातो...दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि
सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.यालाच जीवन म्हणतात.
🔴किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नाही. 😊😊 😊😊 म्हणून नेहमी आनंदी राहा🤗🤗🤗🤗

*मला हि पोस्ट आवडली म्हणुन मि खास लोकांना पाठवत आहे.."      "       🤗🤗🤗🤗🤗
👌जगातील सर्वात सुंदर msg...

"आयुष्यात कितीही चांगली कर्म करा"...
*"कौतुक हे स्मशानातच होतं".....!!!
Previous Post
Next Post

post written by:

Hi friends, welcome to the Apalimarathistatus.in , We started Apalimarathistatus.in as a passion, and now it’s empowering more than 900K+ readers globally.

0 comments: